माझी शोना..

छोट्या छोट्या गोष्टींवरुन उगाच अशी ती चिडते..
पण नंतर सगळं विसरून ती स्वतःच जवळ येते..

रागवते माझ्यावर..
कधी रूसून बसते..
रुसल्यावर मी मनवायची वाट बघत बसते..

मनवायला गेलो कि फारच भाव खाते..
अन नाही मनवलं तर पुन्हा त्यावरून सुध्दा चिडते..

कधी कधी रागाच्या भरात मग मी हि हवं नको ते बोलुन जातो..
रूसूबाइ तेव्हा मात्र गपचुप ऐकुन घेते..

समजून का घेत नाही ही म्हणून तळमळ जीवाची फार होते..
पण आमच्यातल हे भांडण संपावे म्हणून मनाची या तडफड होते..

कधी कधी तर असं वाटतं माझ्यासोबत ही खुश का नसते,
नेहमी नुसता राग रुसवा, भांडण तंटे करत असते?

खरं तर तसं ते काहीच नसतं..
शेवटी काही झालं तरी माणूस आपल्याच माणसापुढे रुसतं..

मी तिच्या मागे-पुढे फिरत राहावं असं तिचं काही नसतं..
प्रेमाने मी तिला समजुन घ्यावं इतकंच काहीसं वाटत असतं..

मी हि वेडा कधी कधी फार थकलेला असतो..
मग तेव्हा हिचं हे चिडणं रुसणं वैताग वाटू लागतो..

पण कितीही ठरवलं तरी चिडून राहता येत नाही तिच्यावर,
तिच अन माझं पटत नसलं तरी करमत नाही तिच्याबिगर..

राग रुसवा सोडून मी मनवायला मग जातो पुन्हा..
रुसलेल्या गालावर लगेच कळी उमलते तिच्या..

तिचा राग एक क्षण नर्कात गेल्याचा आभास करुन देतं..
पण चेहऱ्यावर तिच्या हसू बघून मग स्वर्गात पोहचल्यागत वाटतं..

मान्य आहे माझी शोना जरा जास्तच रागवते..
पण प्रेम सुध्दा माझ्यावर तितकंच जास्त करते..

– सुवर्णा (मेघा).

9 thoughts on “माझी शोना..

Leave a comment